मित्रों…उद्या मोदी देशवासीयांशी संवाद साधणार

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या २५ ऑगस्टला होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून, देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा, या सत्रातील हा तिसरा भाग असेल. मन की बात कार्यक्रम आकाशवाणी समूहावर, दूरदर्शनवर आणि आकाशवाणीचं संकेतस्थळ www.allindiaradio.gov.in. वर पाहता येईल.

‘मन की बात’ कार्यक्रम प्रधानमंत्री कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, ऑल इंडिया रेडिओ तसंच दूरदर्शन आणि युट्यूबवर प्रसारित होईल. आकाशवाणीवर बातम्याच्या प्रसारणा नंतर प्रादेशिक भाषांमधेही मन की बात प्रसारण होईल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन होईल.

महत्वाच्या बातम्या