वाचाळवीरांसाठी मोदींना खास बांबूचा कारखाना उघडावा लागेल- खा. संजय राऊत

Sanjay-Raut

टीम महाराष्ट्र देशा : भाजप पक्षामधील वाचाळवीरांचा तोंडात बांबू घालण्यासाठी मोदींना खास बांबूचा कारखानाच काढावा लागेल अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली . उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

भाजप नेते नितीन गडकरी यांनी ‘आमच्या पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल’, असे वक्तव्य केले होते त्या संदर्भात बोलतानाच संजय राऊत यांनी ‘भाजपच्या वाचाळवीरांच्या घशात बांबू घालण्यासाठी मोदींना देशात एक बांबूचा कारखाना सुरु करावा लागेल,’ असा टोमणा मारला.

भाजप हा आंतरराष्ट्रीय पक्ष असून त्यांच्या तालुका आणि गावपातळीचे नेते पक्षाला चर्चेत ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत युतीची विधाने करीत असतात, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावलाLoading…
Loading...