रविवारी १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ हजार कोटी रुपये होणार डायरेक्ट ट्रान्सफर

टीम महाराष्ट्र देशा- ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी २००० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत.

यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक आहे. या योजनेंवर 75 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार कोटी रुपये तीन टप्प्यांत मिळणार आहेत. याचा पहिला हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जारी करणार आहेत.