fbpx

मोदींनाचंं पंतप्रधान करा अन्यथा संसदेवर बॉम्बहल्ला , भाजप नेत्याचे खळबळ जनक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : अगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रचार सभा पार पडत आहेत. अशाच एका प्रचार सभेमध्ये भाजपच्या एका नेत्याने आपल्या तोंडाचा लगाम सोडून बेताल वक्तव्य केलं आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करा नाहीतर संसदेवर बॉम्बहल्ला होईल, असे भाजपचे आसाम मधील मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी केलं आहे. ते कानपूर मधील एका सभेत बोलत होते.

यावेळी हिमांता विश्वा शर्मा पुढे म्हणाले की, मोदींशिवाय दुसरं कोणी पंतप्रधान झालं तर त्यांच्यामध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं धाडसं नसेल. त्यामुळे येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा अन्यथा संसदेवर पाकिस्तान कडून बॉम्बहल्ला करण्यात येईल. तसेच दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणारांना काँग्रेस पाठीशी घालत आहे, असा आरोप हिमांता विश्वा शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान भाजप नेत्यांना पक्षाच्या वरिष्ठांंकडून सोशल मिडिया समोर बेताल वक्तव्य करण्यास मज्जाव घातला आहे. तरी देखील भाजपचे काही नेते अजूनही बेताल वक्तव्य करत आहेत.