fbpx

मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा होणार ‘या’ दिवशी

टीम महाराष्ट्र देशा- नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७  वाजता पार पडणार आहे. राष्ट्रपतींच्या ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांचाही याच दिवशी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत.