यूएईचा सर्वोच्च मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ने मोदींचा होणार सन्मान

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत आहे. मोदी हे त्यांच्या कार्याने सर्वांना प्रभावित करत आहेत. यांची दाखल जगातील अनेक देशांनी घेतली आहे. त्यात संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया रशिया या देशांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएई सरकारतर्फे यूएईचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ने मोदींचा होणार सन्मान होणार आहे. हा सन्मान सोहळा अबुधाबीमध्ये पार पडणार आहे. तसेच हा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना दिला जातो. त्याचबरोबर राजे, राष्ट्रपती यांनाही हा पुरस्कार दिला जातो.

दरम्यान, हा पुरस्कार मिळणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय आहेत. तसेच यापूर्वी २००७ मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, २०१० मध्ये ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ, २०१६ मध्ये सौदीचे शाह सलमान बिन अब्दुल्ला अजीज अल सौद आणि २०१८ मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींनी या पुरस्काराविषयी बोलताना ‘हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे तर १.३ अब्ज भारतीयांचा सन्मान आहे. यूएई आणि भारताच्या घनिष्ठ मैत्रीचा हा पुरावा आहे. दोन्ही देशातील सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी हे संबंध आवश्यक आहेत. भारत आणि यूएईच्या मैत्रीत कोणत्याही सीमेचं बंधन नाही असं विधान केले आहे.