fbpx

मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे चक्क पाय धुतले!

टीम महाराष्ट्र देशा- सुरक्षा तोडून जनतेशी थेट हस्तांदोलन करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पाहिलं आहे. मात्र आज मोदींनी जे केलं त्यामुळे त्यांनी सर्वानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे.आज प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्याला भेट दिली.यानंतर मोदींनी कुंभमेळ्यात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुवून कर्मचाऱ्यांची मने जिंकून घेतली.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले,कुंभमेळ्यात स्वच्छता आणि साफसफाईचे काम करुन या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे. तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपण त्यांची सेवा करणे, हे भाग्य समजतो.

मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोदींनी गंगा नदीची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला.