‘दहशतवादी हल्ल्या संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला मोदीच गैरहजर होते’

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला स्वतः मोदीच उपस्थित नव्हते, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी पवार म्हणले की, सर्वपक्षीय बैठकीला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी नरेंद्र मोदी तिथे नव्हते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असताना देखील ते धुळे आणि यवतमाळ येथे प्रचारसभेत विरोधकांवर टीका करत होते, असं शरद पवार म्हणाले आहेत.Loading…
Loading...