भारत- अमेरिकेकडे असेल जगातली सर्वात शक्तिशाली सेना

narendra-modi-meeting-us-president_

नवी दिल्ली : भारत- अमेरिका या जगातील दोन महान लोकशाही देशाकडे जगातील सर्वोत्तम सेना असणे आवश्यक आहे असा संकल्प आशियान परिषदेसाठी फिलीपींसची राजधानी मनिला येथे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे एकमेकांशी झालेल्या भेटीमध्ये केला .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या घोषणेने चीन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या झोपा उडाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाकडून तेल खरेदीचं प्रमाण अलिकडच्या काही महिन्यांत 10 दशलक्ष बॅरल्सवर गेल्याने त्याचं ही कौतूक केलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिलं आहे की, ‘अमेरिका आणि जगाच्या अपेक्षेवर भारत खरा उतरेल.’