देशाची अर्थव्यवस्था फ्लॉप मात्र, जनतेच्या पैशांवर मोदी टिपटॉप !

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. तर आता कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारने वित्तीय तूट वाढवल्याचा आरोप केला आहे. यावेळी कॉंग्रेसने २०१९ – २०  या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सरकारच्या कर्ज घेण्याच्या योजनेवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात सुरजेवाला यांनी मोदी सरकार जाता-जाता देशाचा खजिना लुटून जाणार आहेत अशी टीका केली आहे.

या संदर्भात रणदीप सुरजेवाला म्हणाले की, यावर्षी आतापर्यंत मोदी सरकारने ४.४२  लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. प्रत्येक आठवड्यात १७  हजार कोटी रुपये लागतील, ज्यामुळे वित्तीय तूट वाढेल. तसेच जाता जाता मोदी सरकार देशाचा खजिना रिकामा करून जाणार आहेत. वित्तीय तोट्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे देशाची अर्थ व्यवस्था या सरकारच्या शेवटच्या काळात फ्लॉप होणार आहे. मात्र, जनतेच्या पैशांवर मोदी हे टिपटॉप आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने २०१९ – २० या वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहित उधारी योजनेची घोषणा केली आहे. पहिल्या सहामाहीत सरकार ४.४२  लाख कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे.