काँग्रेसचा इतिहास बोफोर्स घोटाळा करणाऱ्या क्वात्राकीचा आहे – नरेंद्र मोदी

रायबरेली : इतक्या दिवसांपासून कॉंग्रेस मोदी सरकारवर राफेल प्रकरणी चिखल उडवत होत. तेव्हा मोदींनी मौनं सर्वार्थ साधनं म्हणत आपला राग गिळला पण आता, राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आज ते रायबरेली येथे जनतेला संबोधित करत आहे.

“खोटेपणा हाच काँग्रेसच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसचा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही,” असं मोदी म्हणाले. सोनिया गांधींच्या रायबरेली या होमग्राऊंडवरुन बोलताना मोदींनी राफेल करारावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. फ्रान्ससोबतच्या राफेल विमानांच्या करारात मोदी सरकारने भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसचा आरोप केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणात काँग्रेसला हस्तक्षेप करण्यास साफ नकार देत करारावर शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याची टिप्पणी दिली आहे. काँग्रेस मात्र या कराराची संसदेच्या संयुक्त समितीकडून (जेसीपी) चौकशी व्हावी या मागणीसाठी अडून बसले आहेत. आज रायबरेलीच्या सभेत नरेंद्र मोदींनी रायबरेली रेल्वे कोचच्या कारखान्यावरुनही काँग्रेसवर निशाना साधला.

पुढे ते म्हणाले की, सुरक्षा करारामध्ये काँग्रेसचा इतिहास बोफोर्स घोटाळा करणाऱ्या क्वात्राकीचा राहीला आहे. हेलीकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चियन मिशेलला काही दिवसापूर्वीच भारतात आणले आहे. मात्र त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसने त्यांचा वकील दिला. ही काँग्रेसची संस्कृती आहे, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला.