मोदी हेच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले पाहिजेत – मुलायमसिंह

blank

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या कार्यकाळातील आज शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झाले. त्यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांनी मोदींचे समर्थन केले आहे. चक्क मोदी हेच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले पाहिजेत अशी इच्छा मुलायमसिंह यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच सभागृहातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत.

यावेळी मुलायमसिंह म्हंटले की , गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधानांनी सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. त्यामुळे माझी एवढीच इच्छा आहे की, आगामी निवडणुकीत सदनातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होवोत.

दरम्यान येत्या निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकार विरोधात विरोधकांनी एकी केली आहे. तसेच कॉंग्रेस कडून प्रत्येक राज्यात भाजप विरोधात जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यामुळे क्षणभर प्रत्येक विरोधकाच्या भुवया उंचावल्या तर सभागृहात एकच हशा पिकला.