‘मोदींचा भारतरत्न देऊन सन्मान केला पाहिजे’

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवले, मोदी सरकारच्या या धाडसी निर्णयानंतर संपूर्ण देशातून मोदी सरकारचे कौतुक केले जात आहे. तर एका खासदाराने पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे खा. गुमान सिंह यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मोदी हे युगपुरुष आहेत. त्यांचा अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यामुळे भारताने देखील मोदींचा भारतरत्न देऊन गौरव करावा. तसेच मोदींच्या कलम ३७०  बाबतच्या निर्णयांमुळे संपूर्ण देश आनंदी आहे. आज जम्मू काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले आहे’ , अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. मात्र या प्रस्तावानुसार जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले. तसेच जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

‘काश्मिरात पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील’

#Article370 : लहू था जो लाल मेरा,अब वो है तिरंगे की लहर

#Article370 : सरकारच्या निर्णयावर राज ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया