मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोदी-शाह राहणार उपस्थित

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. या यात्रेला भाजपचे दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला एक ऑगस्टपासून अमरावतीतून सुरुवात होत आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तसेच शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये समारोप होणार आहे. त्यासाठी शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अशाच प्रकारच्या सध्या जणआशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्यांच्या या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.