‘पेगासस’ प्रकरणावर मोदी, शाहांनी स्पष्टीकरण द्यावे; संजय राऊतांची मागणी

sanjay raut

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा वापर करतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. पण ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे फोन हॅक करण्यात आले असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

यावर पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी राज्यसभा खासदार तथा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले, पेगासस प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारसमवेत अन्य जणांच्या हेरगिरी च्या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे. सरकार प्रशासन कमजोर असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेने खुलासा केला आहे की, या इस्राएल पेगासस सॉप्टवेरअर द्वारे भारतातील दोन केंद्रीय मंत्री ४० पेक्षा अधिक पत्रकार, विरोधी पक्ष नेते व न्यायधीश, अधिकारी यांचा ३०० कार्यकर्ते यांचा समावेश आहे. हा रिपोर्ट रविवारी आला आहे.

राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मलिकाजुर्न खडगे यांच्याशी बोललो असून हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. महाराष्ट्रात ही नाना पटोले यांचा फोन टॅपिंग चा मुद्दा राज्यचा अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यात वरिष्ठ पोलीस आधिकारी शामिल होते, आता तपास सुरु आहे. एक विदेशी कंपनी आपल्या देशातील लोकांचा खासकरून पत्रकारांचा कॉल ऐकत आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांचा फोन टॅप केला जात असेल यात आश्चर्य वाटायला नको असेही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP