भाजपाच्या रोड शो पूर्वी मोदी-शहा यांचे पोस्टर हटवले ; कोलकात्यामध्ये तणाव

टीम महाराष्ट्र देशा- पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सभास्थळी सभेआधीच बंगाल पोलिसांनी जात परवानगीचे कागदपत्र मागितले. मात्र, कागदपत्र ने देऊ शकल्याने थेट सभामंडप तोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सभा स्थळी जमले असून तणावाचे वातावरण आहे.

सातव्या टप्प्यात लोकसभेच्या उत्ती कोलकाता मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी शहा बंगालमध्ये आहेत. येथे त्यांचा रोड शो देखिल होणार आहे.मात्र भाजपच्या रोड शो पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर हटवण्यात येत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारी यंत्रणेचा भाजपविरोधात दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

दरम्यान, जय श्री राम म्हणत मी कोलकातामध्ये येत आहे, हिंमत असेल तर ममता यांनी अटक करून दाखवावी असे आव्हान शहा यांनी काल दिले होते.