मोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar 1

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना आणि भाजपचे भांडण म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचे भांडण आहे त्यामुळे ते तुटत नाही अशा शब्दात शिवसेना-भाजपमधील वादावर आंबेडकरांनी घणाघाती टीका केली आहे. नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.सवर्णांना आरक्षण हा गेम प्लॅन भाजपच्याच पथ्यावर पडणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

“शिवसेना भाजपचं भांडण हे नवरा बायकोचं भांडण नाही तर हे प्रियकर प्रेयसीचं भांडण आहे. नवरा बायकोचं भांडण असतं तर ते तुटतं , पण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण तुटतच नाही. यामध्ये अमित शाह प्रियकर आणि उध्दव ठाकरे प्रेयसी आहेत. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी हा उद्धव ठाकरे यांचा नवा प्रियकर आहे.”