प्रचाराच्या पोस्टरवर मोदी, शहांसहीत सात नेत्यांचे फोटो; तरीही मिळाले फक्त एकच मत, भाजपा नेत्याचे स्पष्टीकरण

d kartik

तामिळनाडू : काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे पदाधिकारी डी. कार्तिक यांना फक्त एकच मत मिळाले. आश्चर्यकारक म्हणजे कार्तिक यांच्या घरामध्ये पाच सदस्य असूनही त्यांना एकच मिळाल्याने ही बातमी सोशल नेटवर्किंगव साईडवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर कार्तिक यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

याचसंदर्भात ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना कार्तिक यांनी आपण भाजपाच्या वतीने ही निवडणूक लढलो नव्हतो असे म्हंटले आहे. मी गाडी हे निवडणूक चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढलो होतो. माझ्या कुटुंबात चार मत आहेत. मात्र सर्व मत पंचायतीच्या वॉर्ड चारमध्ये आहेत. मी पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ९ मधून निवडणूक लढलो होतो. तिथे माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती मतदान करत नाही. दरम्यान सोशल नेटवर्किंगवर माझी खिल्ली उडवण्यासाठी मी भाजपाकडून लढलो आणि माझ्या कुटुंबियांनीही मला मतं दिली नाहीत असं सांगितलं जात आहे. हे दावे चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, कार्तिक यांना एक मत मिळाल्याची बातमी व्हायरल होताच लेखिका आणि कार्यकर्ता मीना कंदासामी ट्विट करत म्हणाल्या की,’स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं आहे. मला यांच्या घरातील चार सदस्यांवर गर्व आहे. ज्यांनी इतरांना मत देण्याचा निर्णय घेतला’, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच एका युझरने दिलेल्या माहितीनुसार डी. कार्तिक यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जारी केलेल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि स्वत:च्या फोटोसहीत सात नेत्यांचे फोटो होते.

महत्वाच्या बातम्या