कोरेगाव – भीमा दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा- पंतप्रधान

narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: ‘कोरेगाव – भीमा दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करा. जातीय विद्वेष रोखा. समाजात फुट पाडणाऱ्यांना धडा शिकवा,’ असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, फूट पाडणाऱ्या आहेत. परंतु संघ आणि भाजप काहीही अघटित घडू देणार नाही. असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. या घटनेवर मौन बाळगल्याने नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी हे आदेश देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना दोन गटामध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते.