सर्व वस्तूवर समान जीएसटी आकारणे अशक्य – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : काल रविवारी देशात जीएसटी लागू करून एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान जीएसटीला एक वर्षपूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपकडून रविवारचा वर्षपूर्ती दिन ‘जीएसटी दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मोदींनी एका वृत्तपत्राला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदी म्हणाले की, ‘जीएसटी’मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांसाठी कराचा एकसमान दर ठेवणे अगदी सोपे झाले असते, पण तसे केल्याने खाद्यपदार्थांवर अजिबात कर लावायचा नाही, असे करता आले नसते. दूध आणि मर्सिडिस मोटार यांच्यावर एकाच दराने कर कसा काय लावता येईल? असे म्हणत मोदींनी सर्व वस्तूंवरील समान जीएसटीची शक्यता फेटाळून लावली.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आम्ही ‘जीएसटी’चा फक्त एकच दर ठेवू, असे आमचे काँग्रेसवाले मित्र म्हणतात. म्हणजेच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, सध्या खाद्यपदार्थ व अत्यावश्यक वस्तूंवर शून्य ते ५ टक्के ‘जीएसटी’ आहे, त्यावर ते १८ टक्के कर लावणार, पण एकसमान दर लावल्याने अन्नपदार्थ व इतर आवश्यक वस्तू महाग होतील व त्याची झळ गरिबांना बसेल.

दरम्यान मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी घराबाहेर न पडणाऱ्या वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मात्र, या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सहभाग घेतला. त्यांनी जीएसटीच्या वर्षपूर्ती निम्मित जीएसटीच्या एकूण वर्षभराच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.

सरकारने घेतला टीकेचा धसका; 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के

सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान

 

You might also like
Comments
Loading...