राफेल डील : सुप्रीम कोर्टाला दिली खोटी माहिती – खर्गे

नवी दिल्ली : मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेल खरेदी प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तरी हा वाद मिटता मिटत नाहीये.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संसदेच्या लोकलेखा समितीचे (PAC) प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी राफेल करारावर पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. मोदी सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल विमाने खरेदी केली होती. या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

मात्र, सुप्रीम कोर्टासमोर कॅगचा अहवालच चुकीचा दिला असल्यामुळे, हा निर्णय आला आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयात एका ठिकाणी उल्लेख केला होता की, कॅगने (CAG) आपला अहवाल सादर केला असून पब्लिक अकाऊंट्स कमिटीने (PAC) हा अहवाल तपासला आहे. परंतु आता पीएसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारने कॅगच्या रिपोर्टबाबत सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली. कारण कॅगचा अहवाल पीएसीसमोर आलेला नाही, असं सांगितलं आहे.