मोदींनी मध्यस्थाची भूमिका बजावली, त्यांना तुरुंगात टाका – राहुल गांधी

rahul gandhi on rafel

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट असून त्यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे, त्यामुळे मोदी यांना तुरंगात टाकायला पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राफेल प्रकरणावरून राहुल यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे.

Loading...

राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानी यांनी फ्रान्स संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. याचा धागा पकडत राहुल गांधी यांनी राफेल कराराबाबत भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री, एचएएल, परराष्ट्र मंत्री यापैकी कुणालाही माहिती नव्हती. मात्र अनिल अंबानी यांना दहा दिवस आधीच यासंदर्भातील माहिती होती. त्यामुळे मोदीनी अंबानी यांच्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी कॅगच्या अहवालावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॅगचा अहवाल म्हणजे चुकीदाराने, चौकीदारासाठी, तयार केलेला अहवाल असल्याची टीका केली आहे. दरम्यान या सर्व गोष्टीवरूनमोदींवर गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला गेला पाहिजे. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे.अशी मागणीही त्यांनी केली.Loading…


Loading…

Loading...