‘लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे’

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या कार्यकाळातील आज शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपन्न झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेवटचे भाषण केले. यावेळी मोदी यांनी आपल्या सरकारच्या काळात केलेल्या कामंचा पाढा वाचला तर लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खरगे या ज्येष्ठ नेत्यांची प्रशंसा केली.

प्रशंसा करताना मोदी म्हणाले की , लालकृष्ण अडवाणी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून तरुण खासदारांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. राजकारणात जवळपास ५० वर्षे होऊनही आजही हे नेते सभागृहात पूर्णवेळ बसतात. इतक्या वर्षानंतरही ते आपली जबाबदारी इमान-इतबारे पार पाडत आहेत.

दरम्यान , समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यांनी मोदींचे समर्थन केले आहे. चक्क मोदी हेच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले पाहिजेत अशी इच्छा मुलायमसिंह यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच सभागृहातील सर्व सदस्य पुन्हा निवडून येवोत अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहेत.

3 Comments

Click here to post a comment