‘मोदींनी दिवसागणिक तुमची निटनीटकी केली’

टीम महाराष्ट्र देशा – नरेंद्र मोदींनी जनतेला दिवसा ढवळ्या लुटले आहे. २०१४मध्ये पेट्रोलचे भाव ५० रुपये लिटर असतील तर २०१८मध्ये ते ८१ रुपये आहेत. एक मोटार सायकलवाला दिवसाला 1 लिटर पेट्रोल टाकत असेल तर दिवसाला ३१ रुपये आणि साडेचार वर्ष दररोज ३१ रुपये महागाई करून सर्वसामन्य जनतेची मोदींनी दिवसागणिक निटनीटकी केली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

लोणी काळभोर, ता.हवेली येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

महाराष्ट्रातील १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे विधान परिषदेमध्ये देऊनही मुखामंत्र्यानी १६ भ्रष्टाचारी मंत्र्यांची चौकशी केली नाही. नुसते पारदर्शी सरकार म्हणायचे आणि दुसरीकडे घोटाळे करायचे असे हे सरकार आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाले.