‘मोदी काका का गांव’ लवकरच पडद्यावर येणार

मोदी काका का गांव

मुंबई : ‘मोदी काका का गांव’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे नाव ‘मोदी का गांव’ असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर ते बदलून आता ‘मोदी काका का गांव’ करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात हिंदीतील चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व पंजाब व उत्तराखंडमधील ६०० पडद्यावर प्रदर्शित होईल. यानंतर देशातील दुस-या भागात करण्यात येईल, असे निर्माता सुरेश झा यांनी म्हटले आहे. या चित्रपटाला अनेक कारणे देत सेन्सार मंडळाने प्रमाणपत्र देण्यात नकार दिला होता.

अखेर 11 महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासांच्या मुद्यावर प्रेरित आहे.