वर्धा : सोयाबीनच्या कापणीपूर्वी चांगला पाऊस आणि जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. ते काही दिवस सोयाबीनची किंमत 10,000 रुपये प्रति क्विंटल राहण्याची वाट पाहत होते जेणेकरून चांगले उत्पन्न मिळू शकेल. पण या क्षणी असे होताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील सोयाबीनचे उत्पादन करणारे शेतकरी चिंतेत आहेत. दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण आता सोयाबीनचे दर कोसळल्याने शेतकरी निराश झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील विदर्भातील खरीप हंगामातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे. गेल्या वर्षी कमी उत्पादन आणि रास्त भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच अस्वस्थ झाला होता.
या सर्व परिस्थितीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरीविरोधी असून, त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच सोयाबीनचे भाव घसरलेत. देशात सोयाबीनचे भरघोस पीक होत असताना आणि चार पैसे हातात येण्याची आशा शेतकऱ्यांना दिसत असतानाच केंद्र सरकारने विदेशातून सोयाबीन आयात केले. केंद्राच्या या निर्णयामुळेच बाजारात सोयाबीनची किंमत मातीमोल झाली, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<