मोदी विकसनशील भारताची ओळख म्हणुन जगभर प्रसिद्ध-रुपाली चाकणकर

RUPALI CHAKANKAR

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आज देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पंतप्रधान मोदींना चिमटा काढत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यशश्वी पंतप्रधान नाहीत तर, दैदिप्यमान कामगिरी करणारे पंतप्रधान आहेत. २०१४ पूर्वी यशश्वी पंतप्रधान झाले त्यानंतर मोदींनी देशाची धूरा सांभाळली व दैदिप्यमान कामगीरी केली असा टोला लगावत त्यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  २०१४ पुर्वी केवळ गुजरात पुरते मर्यादित असलेले मोदी आज मागील ७० वर्षापासून झालेल्या विकसनशील भारताची ओळख म्हणुन जगभर प्रसिद्ध आहेत. अशा दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेचे खा संजय राऊत यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभले. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेले. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही.संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असे वाटते’ असे म्हणत काहीशी तिखट टीकाही राऊतांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या