कलम 370 हटवल्यानंतर मोदींची होतेय शिवरायांशी तुलना

टीम महाराष्ट्र देशा- मोदी सरकारने सोमवारी जम्मू-काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही शिफारस मांडली. पीडीपीसह काही खासदारांनी याला आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर सभागृहात या मुद्यावर चर्चा सुरू झाली. चर्चेअंती विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. त्यानंतर राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाले.

भाजपा खासदार विजय गोयल यांनी सोमवारी कलम 370 हटवल्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार अस म्हणत या निर्णयाला पाठींबा दिला आहे. देशाला एकत्र करणारा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले ! खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मला ही होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा, म्हणत सरकारचे समर्थन केले केले आहे. अमित शहा यांनी मांडलेल्या विधेयकावर बोलत असताना संजय राऊत म्हणाले कि, मोदी सरकारने हिम्मत दाखवली आहे. आजचा दिवस स्वातंत्र्य दिनासारखाच आहे, कलम 370 हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत, ज्यांनी 70 वर्ष काश्मीर धगधगतं ठेवलं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे.

VIDEO- अमित शहांचे राज्यसभेतील पहिले संपूर्ण भाषण

कलम 370 हटवणे म्हणजे आगीशी खेळ – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच शेतकऱ्यांसाठी गिफ्ट, उद्या होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा