fbpx

उद्धव ठाकरेंनी मांडली शेतकऱ्यांची कैफियत,मात्र मोदींनी दिली विषयाला बगल

udhav thakare

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेनेच्या लातूर आणि उस्मानाबादच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औसा येथे आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष केले तर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या भोंगळ कारभारचे वास्तव पंतप्रधानान समोर मांडले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून देखील पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला. मात्र, याच कंपन्या आता शेतकऱ्यांना केवळ पन्नास, शंभर रुपयांचा धनादेश देत शेतकऱ्यांची टिंगल करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी, पीकविमा मिळविताना त्यांची होत असलेली कुंचबना यासर्व बाबी देखील मोदींन समोर उद्धव ठाकरे यांनी मांडल्या.

मात्र या अडचणी उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून याबाबत ब्रशब्द देखील काढला नाही. त्यामुळे आता सामाजिक स्तरावर या संदर्भात चर्चा रंगताना दिसत आहेत.

दरम्यान लातूर जिल्यात अत्यल्प पावसाने दोन्ही हंगाम वाया गेले. 2017 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके हातची गेली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. परंतु, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची वेळ आली, तेंव्हा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पन्नास, शंभर रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची चांगलीच टिंगल केली. त्यामुळे हा जळजळीत मुद्दा घेवूनचं आज उद्धव ठाकरे यांनी थेट मोदींनाच या विमा कंपन्यांना वठणीवर आणून शेतकऱ्यांची हेटाळणी बंद करावी अशी मागणी केली.