मोदींनी केले उत्तरेतल्या महासेतुचे उद्घाटन

आसाम:  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार मानल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं उद्घाटन केलं आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असून त्याची लांबी 4.94 किलोमीटर एवढी आहे. या पुलामुळे चीन सीमेपर्यंतचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अतिशय मोठं आहे.

आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात मोठा रेल्वे-रोड पूल उभारण्यात आला. हा पूल ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तटाला धेमाजी जिल्ह्याला जोडतो. हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार मानला जातो. कारण हा पूल डबलडेकर आहे. या पुलावरुन वाहनं आणि ट्रेन एकाचवेळी धावू शकतात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी 4857 कोटी रुपये खर्च आला आहे.

पंतप्रधान मोदींनी पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी उत्तरेच्या टोकाच्या दिशेनं प्रवास केला. अरुणाचल प्रदेश सीमेवर अनेकदा चीनकडून घुसखोरी केली जाते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

You might also like
Comments
Loading...