fbpx

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेस आणि दुष्काळ सोबत यात्रा करतात

pm rajasthan

जयपुर : राजस्थानमध्ये काँग्रेस आणि दुष्काळ सोबत यात्रा करतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेस प्रकल्पांच्या उद्घाटनाशिवाय काही करत नाही आणि फक्त मोठं मोठं बोलते. तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं बजेटमध्ये फक्त दिखावा केला होता. मोदींनी आज पहिल्या इको फ्रेंडली तेल रिफायनरीचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान उपस्थित होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस आणि दुष्काळ हातात हात घालून चालत असून काँग्रेसनं रेल्वे बजेटमध्ये १५०० हून अधिक घोषणा दिल्या. मात्र त्या हवेतच विरघळल्या. तसेच काँग्रेसनं वन रँक वन पेन्शनमध्ये जवानांसोबत छळ केला होता. २०२२ ला ज्या वेळी लोक ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन करत असतील, त्यावेळीच ही रिफायनरी कार्यान्वित होईल. मोदींनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली आहेत. राजस्थान सरकार ४० हजार कोटी रुपये वाचवण्यात यशस्वी झालं आहे. राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारणार आहे.