मोदींना त्यांच्याच लोकांनी सिरीयसली घ्यायचं बंद केलंय ?

दीपक पाठक  : मिशन शक्ती अभियान यशस्वीपणे पूर्ण करत अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य भारताने सिद्ध केले आहे. बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील तळावरून क्षेपणास्त्राने अवकाशातील उपग्रह नष्ट करण्यात आला, नष्ट करण्यात आलेला उपग्रह हा पूर्वी भारतानेच प्रक्षेपित केलेला मात्र सध्या वापरात नसलेला असल्याचं सांगण्यात येत आहे.

मोदींनी या यशाचे सर्व श्रेय शास्त्रज्ञ आणि देशवासियांना तर दिलेच मात्र हे देत असताना नष्ट करण्यात आलेला उपग्रह हा पूर्वी भारतानेच प्रक्षेपित केलेला मात्र सध्या वापरात नसलेला असल्याचं स्पष्टपणे सांगितले होते.  मात्र नेहमीप्रमाणे जाहिरातबाजी करून श्रेय मिळविण्यात पटाईत असणाऱ्या भाजपनेत्यांनी या मुद्द्यावर देखील विषय समजून न घेता सोशल मिडीयावर पोस्ट करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

Loading...

मोदींच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने काहीतरी अद्भुत केलं आहे आणि शत्रू राष्ट्राचा उपग्रह आपण पाडला असल्याचा जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम पद्धतशीरपणे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून केले गेले.यात सर्वात आघाडीवर होते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील.   क्षेपणास्त्राने अवकाशात उडवण्यात आलेला उपग्रह पाकिस्तान अथवा चीनचा असल्याचं म्हणत  पाटील यांनी त्यांच्याकडे कॉमनसेन्स नसल्याचा पुरावाच दिला.

पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी देखील ट्विट करत ‘भारतावर टेहाळनी’ करत असलेला उपग्रह नष्ट करण्यात आल्याचं सांगितलं आहे.वास्तविक भारताने ही चाचणी करताना भारताचाच जुना उपग्रह नष्ट केला आहे.त्यामुळे बापट यांनी उत्साहाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया काही तासांमध्ये व्हायरल झाली आहे. मोदी काय बोलले हे जरी पोस्ट करण्याआधी बापट  यांनी काळजीपूर्वक ऐकलं असतं तर अशी पोस्ट त्यांनी केली नसती. याचा सरळ अर्थ काढायचा झाला तर मोदींचं भाषण त्यांचीच लोकं सिरियसली घेत नाहीत हे स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळे बापट चांगलेच ट्रोल झाले असून त्यांचे हे ज्ञान बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात लावला आहे.

कॉमनसेन्स आणि  जनरल नॉलेजची कमतरता असलेली बिनडोक लोकं भाजपने उच्चपदावर बसवलेली आहेत अशी टीका आता सोशल मिडीयावर होऊ लागली आहे. आयटी सेलने पाठवलेली पोस्ट जशीच्या तशी पोस्ट केली जाते(म्हणजे स्वतःची बुद्धी वापरली जात नाही) असं देखील बोललं जात आहे.
विरोधकांनी देखील याच मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर शरसंधान केलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांची चांगलीच फिरकी घेतली. “गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील ह्या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तान चे यान पाडले असा दावा केला ह्या दोघांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्क वर सत्कार करायला हवा” अस ट्विट करत या दोन मंत्र्यांचा उल्लेख आव्हाडांनी बिनडोक चौकीदार असा केला आहे. मार्केटिंग करू पाहणारे भाजपनेते चांगलेच उघडे नव्हे तर तोंडघशी पडले आहे.

यापूर्वी नोटबंदी,सर्जिकल स्ट्राईक,शेतकरी कर्जमाफी, विविध आरक्षणाचे मुद्दे अश्या मुद्द्यांचे देखील भाजपने असेच राजकारण केले आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या मुद्द्याचे श्रेय भाजपच्या नेत्यांनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. तो त्यांच्याचं अंगलट आल्याचे चित्र आहे.. 
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'