‘500 वर्षात जे कोणाला जमले नाही ते मानवाच्या रूपातील ईश्वर असणाऱ्या मोदींनी करून दाखवले’ 

modi in ayodhya

नवी दिल्ली-  एका बाजूला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरू आहे.तर दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून राजकारण देखील रंगत आहेत. रोज नवे आरोप -प्रत्यारोप होत आहेत यामुळे मंदिर निर्माणाचा मुद्दा गेली काही दिवस माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी मानवाच्या रूपातील ईश्वर आहेत, असे उद्गार दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी काढले आहेत.

इंद्रपुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राम मंदिर उभारणीबाबत चर्चेवर बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.’पंतप्रधान मोदी मानव आहेत, मात्र मानवाच्या रूपातील ईश्वर आहेत. कारण 500 वर्षात जे कोणाला जमले नाही ते त्यांनी करून दाखवले’, असे आदेश गुप्ता म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच आदेश गुप्ता यांनी हे विधान केले आहे.

तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ‘राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कोणतंही योगदान नाही’ असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.राम मंदिराचा अजेंडा पुढे रेटण्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी, नरसिंह राव आणि विहिंपच्या अशोक सिंघल यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचं कोणतंही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर उभारलं जात आहे असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या 5 वर्षांपासून फाईल पडून असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात