‘मोदी सरकारकडून कोरोनामुळे मृत रुग्णांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न’

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीवरून पुन्हा एकदा केंद्राला धारेवर धरले आहे. ‘केंद्राची आकडेवारी तथा स्मशान व दफनभूमींतील आकडेवारीत मोठा फरक असून, ही तफावत का?’, असा तिखट सवाल त्यांनी याप्रकरणी केंद्राला केला आहे.

प्रियंका गांधी कोरोना व्यवस्थापनाच्या मुद्यावरून सातत्याने केंद्रावर हल्ला करत आहेत. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर ‘जबाबदार कोण?’ नामक मोहीम छेडली आहे. त्यांनी मंगळवारी एका व्हिडिओद्वारे केंद्रावर कोरोना रुग्ण व बळींची आकडेवारी दाबण्याचा आरोप केला. ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बळींच्या आकड्यांचा वापर जनजागृती व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी न करता स्वत:च्या प्रचाराचे साधन म्हणून केला. सरकारने मृत्यूसंबंधी जारी केलेली आकडेवारी तथा स्मशान, दफनभूमी व अन्य स्त्रोतांकडून उपलब्ध झालेल्या अनधिकृत आकडेवारीत एवढी मोठी तफावत का?’, असे त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

‘जगभरातील तज्ज्ञ कोरोनावर मात करण्यासाठी त्यासंबंधित सर्वच माहिती सार्वजनिक करण्याचे पारदर्शक धोरण स्वीकारण्याची मागणी करत आहेत. त्यानंतरही केंद्र सरकार ही माहिती दडवून ठेवत आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘केंद्राच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या ५ शहरांत ५ दिवसांत ९५० जणांचा बळी गेला. पण, स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये मृतांची संख्या तब्बल ४४४२ एवढी नोंदवण्यात आली.

सरकारच्या मते गुजरातमध्ये गत १ मार्च ते १० मेपर्यंत ४२१८ जणांचा मृत्यू झाला. पण, याच कालावधीत सुमारे १ लाख २४ हजार जणांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले’, असेही प्रियंकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP