मोदी सरकारने गाठला जाहिरातीच्या खर्चाचा कळस ! तब्बल ३ हजार ७५५ कोटी रुपये खर्च

टीम महाराष्ट्र देशा: होय ! हे माझं सरकार ही भाजपची जाहिरात चांगलीच वादात सापडली होती. पण तुम्हाला माहित आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर केंद्रात सुद्धा भाजपने जाहिरातीचा अतिरेक केलाय. मोदी सरकारने आपल्या साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात तब्बल ३ हजार ७५५ कोटी रुपये फक्त जाहिरातींवर उधळले आहेत. नोएडाचे माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर तंबर यांनी मागितलेल्या माहितीत ही धक्कदायक बाब समोर आली आहे.

इलेक्टॉनिक मीडिया आणि टीव्हीवर मोदी सरकारने १६५६ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर प्रिंट मीडियातील जाहिरातींवर सर्वाधिक १६९८ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच होर्डिंग, पोस्टर, बूकलेट इत्यादींच्या माध्यमातून ३९९ रुपये खर्च केले आहेत.