मोदी सरकारचा नवा उपक्रम, पंतप्रधान मोदी काढणार भाजप खासदारांची पदयात्रा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी आणि अन्य नेत्यांसाठी वारंवार अनेक उपक्रम राबवत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या पदयात्रेला सुरुवात होणार असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे.

आज भाजपाच्या ससंदीय दलाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्तितीत दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासमेवत अनेक दिग्गज नेते हजर होते. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पदयात्रेबाबत सूचना दिल्या. ही पदयात्रा एकूण 150 किलो मीटरची असणार आहे. या पदयात्रेत खासदार, आमदार, भाजपा नेते आणि कार्यकर्ते असणार असून दररोज 15 किमी म्हणजेच 10 दिवसात 150 किमी चालणार आहेत. तसेच या पदयात्रेतून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असून प्रत्येक बुथवर वृक्षारोपणही केले जाणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीत धुसफूस ; सन्मान राखला गेला नाही तर बाहेर पडू : कॉंग्रेस