पाकिस्तानवर मोदी सरकारचा ‘आर्थिक’ल स्ट्राईक, आयात बंदीच्या नियमावर संसदेत होणार शिक्कामोर्तब

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तर आता भारत सरकारने पाकिस्तानवर ‘आर्थिक’ल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानवर लावलेल्या आयात बंदीच्या नियमावर आज लोकसभेत शिक्कामोर्तब होणार असल्याच सांगितल जात आहे. त्यामुळे भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला जबरदस्त आर्थिक फटका बसणार आहे.

Loading...

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत या संदर्भात एक वैधानिक प्रस्ताव मांडणार आहेत.या प्रस्तावामध्ये पाकिस्तानमधून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनाच्या आयातीवर 200 टक्के दराने सीमा शुल्क लावण्याच्या निर्णयावर एकमताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

दरम्यान भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा दिला होता. त्यामुळे भारताशी व्यापार करताना पाकिस्तानला कर सवलत मिळत होती. मात्र आता भारताने दहशतवादी पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तर पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला आहे.Loading…


Loading…

Loading...