पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी जोपर्यत बरोबर आहोत, तोपर्यंत विरोधक कितीही एकत्रित आले, तरी काही फरक पडणार नाही. 2024 साली पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार,’ असा दावा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस या गावात अयोजित 5 व्या कळस कृषी प्रदर्शनाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसून ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका आठवले यांनी केली.

Loading...

‘अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे भरीव मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र राज्यात सत्तेत येण्यापूर्वी संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावा.’ असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

यावेळी आठवले यांनी ‘शेतकरी जिंदाबादचा द्यायचा आहे नारा ; शेकऱ्यांच्या दुष्मनांचे वाजवायचे आहे बारा’ अशी कविताहि सादर केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेला नदीजोड प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती जमाती च्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग करून सवर्णांना 10 टक्के आरक्षणाचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून त्याचा लाभ राज्यातील मराठा समाजाला होईल, असे आठवले म्हणाले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण