१०० दिवसांत मोदी सरकार जाणार : नवाब मलिक

nawab malik at ncp press

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जन की बात दिसलीच नाही. आत्मविश्वास गमावलेले पंतप्रधानच मुलाखतीत दिसले, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. जी मन की बात रेडिओवर ऐकायला येत होती, ती टिव्हीवर दिसली हाच काय तो फरक, असेही ते म्हणाले.

मलिक पुढे म्हणाले की ४ वर्षांत सरकारने काय केले, नोटबंदीने काय साध्य झाले हे पंतप्रधान मोदींनी सांगितलेच नाही. या मुलाखतीतून जनतेला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सापडलीच नाहीत, अशी खंत मलिक यांनी व्यक्त केली. १०० दिवसांत नरेंद्र मोदी यांचे हे सरकार जाणार, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.

Loading...