कोरोनाला धोबीपछाड देण्यासाठी मोदी सरकारनं केले ‘’हे’ 6 मोठे बदल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करत आहेत. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जनतेने जनतेद्वारे स्वतःवर कर्फ्यु लादावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याला त्यांनी ‘जनता कर्फ्यु’ असे नाव दिले आहे. येत्या 22 मार्च रोजी लोकांनी घराबाहेर पडू नये असं त्यांनी सुचवलं आहे. रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत लोकांनी बाहेर पडू नये असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, 22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही.राज्य सरकारने अधिसूचना काढून 65 वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर (वैद्यकीय कामाव्यतिरिक्त) पडू नये, असा सल्ला द्यावा. त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये.

राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मूभा द्यावी.रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, (अपवाद: विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग)गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना.

दरम्यान, फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.