मोदी सरकार फक्त उद्योगपतींचे ! राज ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे.

व्यंगचित्रात दाखवल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा पास झालेला विद्यार्थी, आय ए एस विद्यार्थांना वगळून भाजप सरकार उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोकांना संधी देत आहे. नुकताच नरेंद्र मोदी यांनी यूपीएससी ची परीक्षा न देता अधिकारी होता येणार, असा निर्णय घेतला. त्यामुळे हा नर्णय फक्त धनदांडग्यासाठी व उद्योगपती साठी आहे. अशे भाष्य राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केले आहे.

एकीकडे चित्रात स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करत आहे. मात्र त्याच्या अभ्यासाची, मेहनतीची कदर न करता. फक्त पैसा आणि उद्योगपती असल्यामुळे नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतांना दाखविले आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंनी संभाजी भिडेंवर देखील ताशेरे ओढले आहे. ‘माझ्या बागेतील आंबे खाल्यावर मुलं होतात’ असा अजब दावा भिडे यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.