मोदी सरकार माझा आवाज दाबत असून माझा एन्काऊंटर करण्याचा डाव ; प्रवीण तोगडिया

माझ्यावर राजकीय दबावाच्या अंतर्गत कारवाई करू नका

अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता असा धक्कादायक आरोप मोदी सरकारवर केला आहे. जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट मात्र मी घाबरणार नाही, हिंदूंचा आवाज उठवणारच असे तोगडिया यांनी स्पष्ट केले. अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

अनेक वर्षांपासून मी हिंदू एकतेसाठी लढतो आहे. मात्र जाणीवपूर्वक माझा आवाज दाबला जातो आहे असाही गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते आणि त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. तसेच माझे एन्काऊं टर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. मला माझ्या घरी सकाळच्या वेळी आलेल्या एका माणसाने ही धक्कादायक माहिती दिली. मात्र मी घाबरलो नाही डगमगलो नाही. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. काही वेळापूर्वी ते शुद्धीवर आले त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.माझ्यावर सेंट्रल आयबीकडून दबाव टाकला जातो आहे. देशभरात माझ्याविरोधात खटले भरवण्यात आले. ज्या केसेस मला ठाऊकही नाहीत त्या जुन्या केसेस उकरून काढत माझे नाव त्यात गोवण्यात आले. मला अटक करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. गुजरात पोलीस असो किंवा राजस्थान पोलीस मी कोणाच्याही विरोधात नाही. माझ्यावर राजकीय दबावाच्या अंतर्गत कारवाई करू नका मी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहे असे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी केले.

प्रवीण तोगडिया बेपत्ता झाल्यानंतर वीहिंपने अहमदाबाद क्राईम ब्रान्चमध्ये तक्रार दाखल केली होती. तोगडिया संशयित परिस्थितीत बेपत्ता झाले असून त्यांच्या जीवाला धोका आहे, असं विहिंपने तक्रारीत म्हटलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलं. अहमदाबादमधील विहिंपच्या कार्यालयाबाहेर एसआरपीचे सुमारे 30 जवान सुरक्षेसाठी तैनात केले होते.