मोदी सरकारचा दणका! ममतांच्या सल्लागारावर ‘या’ कारणामुळे कारवाई निश्चित

modi vs mamata

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्यावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय. बंडोपाध्याय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विद्यमान सल्लागार म्हणून काम पाहतात.

बंडोपाध्याय यांना कार्मिक व प्रशिक्षण विभागाने एक पत्र पाठवले आहे. त्यांना तीस दिवसांच्या आत त्यावर उत्तर देण्याची सूचना देण्यात आली आहे. अन्यथा कडक दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र सरकार पूर्ण किंवा आंशिक रूपाने त्यांचे निवृत्तिवेतन किंवा ग्रॅच्युइटी रोखू शकते. त्याचबरोबर दोन्ही कारवाया देखील करू शकते.

काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान २९ मे रोजी आयोजित बैठकीला अल्पन हजर राहिले नव्हते. यासंबंधी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांना ३१ मेपर्यंत प्रतिनियुक्तीवर केंद्रात दिल्लीला प्रत्यक्ष येऊन खुलासा करण्यास सांगण्यात आले. परंतु ते पोहोचले नाहीत. त्यांनी आधीपासूनच मंजूर सेवावृद्धी ऐवजी निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर ममतांनी त्यांची विशेष सल्लागार पदावर नियुक्ती केली होती.

महत्वाच्या बातम्या

IMP