#NoConfidenceMotion : मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला : टीडीपी

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला, मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, भेदाची भावना ठेवली, त्यामुळे आंध्राच्या 5 कोटी जनतेच्यावतीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्याची टीका टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहे.दरम्यान, अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

चर्चेसाठी कुणाला किती वेळ?

भाजप – 3 तास 33 मिनिटं

काँग्रेस – 38 मिनिटं

अण्णा द्रमुक – 29 मिनिटं

तृणमूल काँग्रेस – 27

शिवसेना- 14 मिनिटं

टीडीपी- 13 मिनिटं
तेलंगणा राष्ट्र समिती – 9 मिनिटं

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?
सरकार ज्या सभागृहाला जबाबदार असतं त्या सभागृहाचा जेव्हा सरकारवर विश्वास उरत नाही तेव्हा हा प्रस्ताव सादर केला जातो.हा प्रस्ताव विरोधातला कुठलाही पक्ष कुठल्याही अधिवेशनात आणू शकतो. लोकसभेतल्या किमान 50 किंवा 1/10 सदस्यांचा त्याला पाठिंबा आवश्यक असतो. प्रस्ताव सादर करताना या सदस्यांना लोकसभा अध्यक्षांसमोर उभं राहून तसं सांगावं लागतं. किमान 50 सदस्यांचा पाठिंबा स्पष्ट झाल्यास अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतात.या प्रस्तावाकडे विरोधी पक्षाच्या हातातलं एक हत्यार म्हणूनही पाहिलं जातं. सरकारला अडचणीत आणण्यासाठी त्याचा वापर विरोधक करतात.विरोधकांकडे पुरेसं संख्याबळ असेल तर किंवा सत्ताधारी पक्षात किंवा आघाडीत फूट पडली तर मात्र हा प्रस्ताव सरकारसाठी कठीण असतो.