मोदी सरकारच्या काळात प्रचंड विकास कामे झाली – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई – पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे सामान्य आणि गरिबांसाठी काम करणारे सरकार आहे. मोदी सरकारच्या चार वर्षाच्या काळात प्रचंड विकास कामे झाली असून, त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच या चार वर्षात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकारची चार वर्षे ही संपूर्ण देशाच्या प्रगतीची वर्षे आहेत. सरकारने सामान्य माणसासाठी काम केले असून वेगवेगळ्या योजनांचा कोट्यवधी लोकांना लाभ झाला आहे. दरवर्षी आपले प्रगतिपुस्तक जनतेसमोर मांडणारे पारदर्शी सरकार देशात आहे. विरोधकही मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत, असे सांगतानाच मोदी सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.