मोदी सरकारने 46 महिन्यात जाहिरातबाजीवर खर्च केले 4 हजार 343 कोटी रुपये

narendra modi

मुंबई : मोदी सरकार जाहिरातबाजीवर करत असल्या खर्चावरून सरकरवर टीकेची झोड उठली असतानाच, आता सरकारने गेल्या 46 महिन्यात सर्वप्रकारच्या जाहिरातबाजीवर 4 हजार 343 कोटी 26 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आलीये. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच अँड कम्युनिकेशन खात्याने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली.

दरम्यान जाहिरातबाजीवर होणाऱ्या पैशाच्या उधळपट्टीबाबत चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर यावर्षी सरकारने खर्चात 25 टक्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीच्या मोदी सरकारने जाहिरातबाजीवर तुलनेत 308 कोटी रुपये कमी खर्च केले आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्र सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत विविध जाहिरातीवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन खात्याचे वित्तीय सल्लागार तपन सुत्रधर यांनी अनिल गलगली यांना 1 जून 2014 पासूनची माहिती उपलब्ध करुन दिली आहे.