मोदी सरकार हे ‘गेम चेंजर’ नसून, ‘नेम चेंजर’

ghulam-nabi-azad

नवी दिल्ली: कॉंग्रेस आणि भाजप पक्ष कधीच एका मतावर ठाम नसतो. दोन्ही पक्षाच्या दोनं विरुद्ध बाजू आहेत. मोदी सरकार ने कॉंग्रेस च्या योजना नाव बदलून सूर केल्या आणि फुकटच श्रेय लुटत आहे. असा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण करताना सोमवारी काँग्रेसवर टीका करत मोदी सरकार हे गेम चेंजर असल्याचे सांगितले होते. याला आज राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उत्तर दिले.

गुलाम नबी आझाद म्हणाले, मोदी सरकार हे ‘गेम चेंजर’ नसून, ‘नेम चेंजर’सरकार आहे. संयुक्‍त पुरोगामी आघाडीने १९८५ नंतर आखलेल्या सर्व योजनांचे फक्त नावे बदलले आहेत. काँग्रेसच्या योजनांची फक्‍त नावे बदलून त्या पुन्हा जनतेसमोर आणण्याचे काम मोदी सरकार करत आहे. ‘संपुआ’च्या जनऔषधी योजनेचे नाव पंतप्रधान जनऔषधी योजना असे करण्यात आले, तर २००८ सालच्या आमच्या नॅशनल चाईल्ड प्रोग्रामचे नाव बेटी बचाओ, बेटी पढाओ असे करण्यात आले आहे. असेही ते म्हणाले .