#coronavirus : ‘करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार’

Modi

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. वाढत्या रुग्णांबाबत मोठी चूक ही केंद्र सरकारची असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, ‘इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. राज्य सरकार ज्या परिस्थितीत या सर्वांना सामोरं जात आहे निश्चितच ते चांगलं काम करत असल्याचं चव्हाण यांनी सांगितले.

मात्र टेस्टिंग किट्ससाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही. तरीही आम्ही सर्वाधिक चाचण्या करत आहोत आणि त्यामुळेच रुग्णांची सर्वाधिक संख्या सापडत असल्याचं त्यांनी यावेळी येथे बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, ‘रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी किती ट्रेन पाठवल्या हे सांगण्यापेक्षा सर्व रेल्वे खुल्या कराव्यात. कोरोनाच्या आधी जेवढ्या ट्रेन जात होत्या, तेवढ्या सोडाव्यात. भरतील नाहीतर नाय भरतील. एकमेकांवर आरोप करणे हे केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही. त्यामुळे असं राजकारण होतं. याचा अर्थ पंतप्रधानांना आपल्या मंत्र्यांवर अंकुश ठेवता येत नाही का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला; पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण

महाविकास आघाडीकडे केवळ दोनच पर्याय, भातखळकरांचा हल्लाबोल

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – उद्धव ठाकरे