मोदी पाकिस्तानात जाऊन केक कापतात, मिठ्या मारतात, आता काश्मीरवर बोला- संजय राऊत

मोदी पाकिस्तानात जाऊन केक कापतात, मिठ्या मारतात, आता काश्मीरवर बोला- संजय राऊत

modi-raut

मुंबई : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र अद्यापही सुरु आहे. दोन परप्रांतीय मजुरांची रविवारी(१७ ऑक्टो.)हत्या करण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून सर्व परप्रांतीय मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये दाखल करण्यात येत आहे. या पंधरा दिवसांमध्ये तब्बल ११ जणांचा बळी दहशतवाद्यांकडून घेण्यात आला असून अजूनही हे हत्यासत्र कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. तसेच याविषयी प्रतिक्रिया देतांना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात आज मुंबईत पत्रकारांशी संवाद राऊत म्हणाले की,’कधी काश्मिरी पंडितांना मारलं जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे. याच्यावर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीतील धमक्यांची भाषा वापरून हे थांबले जाणार नाही. चीन लडाखमध्ये घुसले आहे. सांगा की चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढंच मी सांगू शकतो.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आम्ही सातत्याने सांगतोय पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेऊ नका. राजकीय, आर्थिक, व्यापारी किंवा सांस्कृतिक कोणतेही संबध ठेऊ नका हीच आमची कायम भूमिका राहिलीय. मोदी तिकडं जाऊन केक कापतात, मिठ्या मारतात. तसं आम्ही करत नाही. काश्मीर प्रश्नाची जबाबदारी विरोधी पक्षावर का टाकता? तुम्ही सांगा काय करणार आहात ते. दुबईत क्रिकेट खेळताय का खेळत नाही ते सोडा, जम्मू काश्मीरवर बोला. तिथं काय करणार आहात ते बोला’, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या