“मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा” ; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला दिपाली सय्यद यांचे प्रतीउत्तर
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पाहावयास मिळत आहे. देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली.
त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली. तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. यावर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या: